Tuesday, 3 June 2025

कथा ०४

संध्याकाळचा सूर्य किती नाजूक असतो, त्याचा तांबड्या रंग वेगळाच आकर्षण बिंदू झाला आहे. सूर्योदयाचा सूर्य आणि सूर्यास्ताचा सूर्य हे दोन्हीही सूर्य किती वेगळे असतात. दोघांचा रंग त्यांच्या किरणांचा स्पर्श किती वेगळा असतो. दोघेही स्वतःचे वेगळेपण जपत असतात, एक उगवतीचा मालक असतो तर दुसरा मावळत असतो.

डोळ्यासमोरचा कॅमेरा बाजूला करून मी फक्त त्या सूर्याकडे पाहतो, मावळती कडे जाणारा सूर्यात दिवसभराचा शीन-थकवा दिसत असतो आणि सोबतच अनुभवाचे गठुडं देत असतो. कॅमेरा टेबल वरती ठेवला आणि सहज विचार मनात आला. निसर्गातचे रंग चोरता आले असते तर, म्हणजे पहा ना मावळतीच्या सूर्याचा नारंगी रंग ब्रश लावून घेता आला, किंवा नाजूक पानांचा हिरव्या रंगात ब्रश बुडवून रंगवता आले, नाही तर एखाद्याच्या गुलाबी ओठांचा रंग ब्रश फिरवून घेता आला तर किती मजा आली असती. नवीन रंग निर्माण करायची गरजच पडली नसती सगळे रंग निसर्गातून पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे उचलता आले असते, पण हे थोडेच खरं आहे ते थोडेच शक्य होणार आहे.

कॅमेरा ची लेन्स काढली आणि कॅमेरा बॅग मध्ये ठेवताना डोक्यात सहज विचार आला. काल सकाळी याच बागेत व्यायाम करत होती "ती", पण आता दिसत नाही. 'अरे आपण संध्याकाळी आलेलो आहोत बागेत, सकाळी नाही.' सहज विचार येऊन गेला. 'कदाचित ती फक्त सकाळीच येत असेल ! काय माहित? जाऊ द्या.' विचार चक्र काही थांबत नसते. कुतूहल म्हणून का होईना एखाद्याबद्दल आकर्षण निर्माण होत. 'पण होती छान ती! सुंदर!' बघत रहावी अशी, आखीव-रेखीव बांध्याची. खरं सांगतो एवढी सुंदर स्त्री यापूर्वी बघितलेल्या आठवतच नाही मला.' पुरुषाचे मनच असतं तसं, स्त्री ही कायम आकर्षण बिंदू असते पुरुषा करता.  कॅमेरा ची बॅग खांद्यावर टाकली आणि बागेच्या गेटकडे चालत निघालो, जॉगिंग ट्रॅक वरती अनेक जण घामगाळत चरबी उतरवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना मी दात देत होतो. मनुष्य कसा प्रयत्नशील असतो बघा ना एकीकडे  पोटाकरता तो कमावत असतो आणि दुसरीकडे कमवलेले जॉगिंग करून जिरवत असतो. आरोग्य टिकाव म्हणून अशी धडपड करावी लागते.



गेटवर पोहोचता पोहोचता संध्याकाळचे पावणे-सात सात वाजले असतील, सुट्टा मारावा म्हणून बागेच्या शेजारच्या पान टपरीकडे मी वळणार होतो तेवढ्यात पुन्हा ती नजरेस पडले. मुलाला बागेत खेळण्यासाठी घेऊन येत होते पाच सात वर्षाचा तिचा मुलगा बागेतल्या खेळण्याच्या ओढीने तिच्या पुढे पुढे पळत होता आणि ती मागून त्याच्या नावाने ओरडत बागेकडे येत होती. तिला बागेकडे येताना बघून मी तिच्याकडे तसाच बघत उभारलो, स्तब्ध एखाद्या मूर्ती प्रमाणे तिच्या कडे मी पाहत होतो. तिचे लक्ष असण्याची गरजच नव्हती पण मी मात्र तिच्याकडे पूर्ण ओढला गेलेला होता. मी बागेच्या गेट वरती पायऱ्यांवर तसाच खोळंबलेला होतो तिला पाहत, सुंदर दिसावे म्हणून तिने काही वेगळे प्रयत्न केलेले नव्हते. तिच्या रंगावरती उठून दिसेल असा सलवार कुर्ता घातला होता, त्यावरती मोकळे सोडलेले तिची मुलायम कळेभोर केस होते, तिच्या डोळे विलक्षण कामुक होते, खरं तर तिचे डोळेच आकर्षित करत होते, एक नशा होती तिच्या डोळ्यात ज्यामुळे मी तिच्याकडे ओढला गेलेला होतो. धारदार नाक आणि त्याखाली तिचे गुलाबी ओठ, किती नाजूकपणे रेखाटलं असेल असं वाटतं तिच्या ओठांना, कुठंही कमी जास्त नव्हते ते आणि रंग सुद्धा तिच्यावरती उठून दिसत होता ओठांचा. हवेच्या झोक्याने तिच्या मुलायम केसातील काही टुकार केस चेहऱ्यावरती येत होती, एखाद्या खट्याळ मुलं सारखे सैर भैर करत होते तिला. त्यातील केसांची बट हाताने हळुवारपणे कानामागे सरकवत तिने माझ्याकडे पाहिले पुन्हा स्वतःच्या मुलाला आवाज देत थांबण्याकरता सांगितले. तिच्या मुलाकडे पाहून हलकासा वयाचा अंदाज तिच्या येत होता चाळीशी मधील "ती" एवढी मोहक सुद्धा असू कशी शकते?, हेच तिने केसांची बट मागे सरकवताना मला जाणून गेले. काय ते सौंदर्य, पुरुषाला प्रणयाची ओढ असते पण स्त्रीच ती सार्थ करत असते. अजिंठा मधील लेण्या कोरताना जिचा चेहरा आठवला असेल, तिलाच प्रत्यक्ष मी डोळ्याने अनुभवत होतो. पण काय जादू होते तिच्या डोळ्यात, तिच्या नाकात, तिच्या ओठाततिच्या हनुवटीत, तिच्या नखशिखांत शरीरात जी विजेसारखे चमकून मला कायम संमोहित करत होती.

ती पायऱ्या चढून तिच्या मुलाच्या मागे चालत गेले आणि मी पायऱ्या उतरणारा अलगद वळून तिच्या मागे चालत राहिलो. आता उत्तर संध्याकाळ झालेली होती पक्षांचा किलकिलाट हा जवळपास थांबलेला होता. दिव्याच्या प्रकाशात बाग उजळत होती. ती अजून सुद्धा बागेमध्ये इकडून तिकडे तिच्या मुलाच्या मागे फिरत होती आणि मी तिला न्याहाळत होतो. दोन-तीनदा तिने माझ्याकडे बघितले सुद्धा, कदाचित तिला जाणवले असेल की मी तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत आहे किंवा तिचा पाठलाग करत आहे. पण तिचे संमोहन एवढे होते की मी सराईत पणे तिच्या कडे पाहत होतो

No comments:

Post a Comment

कथा ९

  बाई म्हणजे माझी आज्जी सुरकुतल्या चेहऱ्याची, टपोऱ्या पाणीदार डोळ्यांची, डोक्यावर पदर घेतलेली, नाकात नथ घेतलेली, कपाळावरती ठसठशीत कुंकवाचा ग...