Showing posts with label new age story. Show all posts
Showing posts with label new age story. Show all posts

Sunday, 13 July 2025

कथा ६

 

पुण्यामधून ताम्हणी घाट मार्गे माणगाव मध्ये उतरलो, कोकणात आल्याची चाहूल त्यावेळेसच लागली होती.  सह्याद्री मधील जंगल या पठारावरती पसरलेले दिसत होते. मागे सह्याद्रीचा खडा पहाड आणि त्याची अंधारात दिसणारी अकराळ विक्राळ आकृती थरकाप उडवत होती. त्यावेळी संध्याकाळचे सहा साडेसहा झाले असतील, अंधार पडायला सुरुवात झाली होती. पक्षी घरट्याकडे वापस येत होते आणि त्यांच्या किलकिलाट झाडावरती सुरू झालेला होता. सह्याद्री आणि जंगल यांचं नातच गूढ आहे, एखाद्या आदि मानवा प्रमाणे सह्याद्री पसरलेला आहे आणि त्याच्या अंगावर विस्तारलेले हे गुढ जंगल आहे. तिन्ही सांजेच्या वेळी आम्ही गाडीने सह्याद्री उतरला होता, वाटेत छोट्या वाड्या- वस्त्या ताम्हणी घाट संपल्या संपल्या सुरू झाल्या होत्या. आम्ही माणगाव मार्गे दिवेआगार रस्त्याने मूळ कोकणात उतरत होतो. आम्हाला ज्या गावी जायचं होतं ते गाव अजून खुप दूर होते आणि त्यात कोकणातले हे वळणावळणाचे रस्ते त्यामुळे काही अंतर कापायला तास दीड तासाचा वेळ लागणार होता याचे आम्हाला जाणीव होते. आता ताम्हणी घाट मागे पडून बराच वेळ झाला होता आणि आम्ही अजून त्या गावी पोहोचलो नव्हतो. आता रात्रीचे दहा-साडेदहा झाले होते पोटात कावळे ओरडायला लागले होते. सगळ्यांना प्रचंड भूक लागली होती पण याआड मार्गी रस्त्यावरती जेवणा करता तर सोडाच, पण साधे चहा पाण्याचे सुद्धा छोटा हॉटेल किंवा टपरी नव्हती, गोल गोल फिरणारा रस्ता, काळाकुट्ट अंधार आणि प्रचंड मोठा जंगल एवढेच काय ते आमच्या सोबत चालत होते.

एकत्र आम्ही पाच जणांनी ही कोकणची ट्रिप प्लॅन केली होती. खूप दिवसापासून एकत्रित फिरायला जायचं ठरवत होतो पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ते रद्द होत होते. यावेळी मात्र मुहूर्त साधला सर्वजण या ट्रीपला निघालो. पुण्यातून निघताना आम्ही या चार दिवसाच्या ट्रीपचे प्रचंड मोठे नियोजन केले होते म्हणजे प्रत्येक दिवशी काय करायचे याची सविस्तर आणि मोठी अशी यादीत आमच्याकडे होती पण हा अनुभव पाहता त्यातील पहिलेच नियोजन आता फसताना आम्हाला जाणवत होते. भूक आणि हा गोल गोल वळणाचा प्रवास आता कंटाळवाणा बनत होता. रात्रीच्या अकरा वाजले तरी खायला काही मिळत नव्हते म्हणून चिडचिड होत होती. अंधार असल्यामुळे किती अंतर कापले याचा सुद्धा अंदाज येत नव्हता. पाय मोकळे करावे म्हणून सिगरेट चे एक दोन  झुरके मारावे असा विचार आल्यामुळे आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला लावली खाली उतरलो. रस्त्याहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना आमची गाडी दिसावी म्हणून पार्किंग लाईट लावले होते. यावेळी त्या रस्त्यावरती आमच्या शिवाय इतर कोणीच नव्हते, डोळ्यासमोर काळाकुट्ट अंधार होता,  मात्र पार्किंग लाईटच्या तांबड्या चालू बंद प्रकाशात आम्ही एकमेकांना चाचपडत होतो

मागील काही तासापासून गाडीतील एसीमध्ये बसल्यामुळे बाहेरच्या हवेचा आम्हाला स्पर्श नव्हता पण गाडी बाहेर उतरतात आम्हाला एक अनाहूत अशा थंडाव्याचा स्पर्श बाहेरच्या हवेमध्ये जाणून गेला. दूरपर्यंत मनुष्यवस्तीचा कसलाच नामोनिशान नव्हता ते  दिसणार तरी कसा कारण आम्ही गर्द जंगलामध्ये होतोत. आमच्यापैकी एकाने आणलेल्या सिगरेटच्या पाकिटामधून एक सिगरेट काढून ओठांमध्ये धरत लायटरने पेटवली. एक मोठा झुरका ओढला, तेव्हा जळालेल्या तंबाखूच्या वासाने आमच्या डोक्याला झणझण्या आल्या थोडासा तणाव मुक्त झाल्यासारखे वाटायला लागले. अजून एक दोघांनी सिगरेट पेटवल्या, मनसोक्त झुरके मारून झाल्यावर आम्ही पुढील प्रवासा साठी गाडी मध्ये बसण्याकरता वळालो तेव्हा कोणीतरी आमचा कानोसा घेत असल्यासारखे जाणवले, सिगरेट च्या झुरक्याने थोडे ताजेपण आमच्यात आले होते, भूक सुद्धा थोडी कमी झाली होती. हवेत अजून सुद्धा तसाच गारवा होता. निरव शांतता आणि गडद अंधार डोळ्यासमोर होता. आम्ही सर्व पुन्हा एकदा गाडीत बसलो आणि गाडी सुरु करण्यासाठी म्हणून पार्किंग लाईट बंद केल्या, आता सर्वत्र अंधार होता, गाडीत आणि गाडीच्या बाहेर दोन्ही ठिकाणी फक्त काळोखाचे साम्राज्य होते. सर्व गाडीत बसल्याची खात्री केली आणि गाडी सुरु करून हेडलाईट लावली व पाहतो ते  समोर काय !

 क्रमशः

Tuesday, 9 April 2024

कथा: ५


चहा-सुटा मारायला आता खाली उतरलो, सकाळी वाजता लॉग इन केल्या पासून एका मागून एक कॉल line-up होते, त्यामुळे पाणी प्यायला काय किंवा खाजवायला सुद्धा वेळ मिळाला नाही. लंच ला अजून तास दीड तास होता. तेव्हा म्हटलं चहा सिगरेट तरी मारू म्हणून राक्याला पिंग केले. राक्या म्हणजे आमचा राकेश मूळचा विदर्भातला माझ्या सोबत प्रोजेक्ट मॅनेजर आहे. त्याला पिंग केलं तर पठ्या कुठल्या तरी चिनी क्लायंट समोर डोकं आपटत बसला होता. डोळ्यावरचा चष्मा नाकावरती घसरलेला पण पसरलेल्या नाका मुळे अडलेला, विदर्भाचे ऊन चेहऱ्यावरती झळाळलेले, राक्या तसा शांत पण आज या चीन्या ने त्याचा घाम काढला. राक्या च्या काना वरचे केस त्या चीन्या ने उभे केले होते.  ह्याला चिनी येत नाही आणि त्याला इंग्लिश कळत नाही. आणि  मग आहेत दोघे ही गुगल करत बोलणारे. त्या चीनी ची आई-माई काढत राक्याने 'तुझं तू जाऊन ये बे', असं मला सुनावले. बॉस च्या केबिन कडे पाहिलं तेव्हा आज्या कोणत्या तरी इंटन वर चढत होता, कारण काय माहित नाही मी माहिती सुद्धा घेतली नाही. त्याच हे आज काल नेहमीचे झाला आहे. तर आज्या  म्हणजे आमचा अजय आमचा बॉस, मी राक्या आणि आज्या आम्ही सोबतच ह्या कंपनीत executive म्हणून लागलो होतोत पण कर्तृत्वान अजय मध्ये कर्तृत्वा सोबत एक सुप्त गुण होता आणि त्या गुणा मुळे तो आज आमचा बॉस बनला होता. आज्या तसा आमचा मित्र पण कंपनी प्रिमायसिस मध्ये तो आमचा बॉस असतो. त्याला तरी चहा सुटा करता विचारावे म्हटले तर तो त्याच्या आवडत्या कामत व्यस्त होता. दोन महिन्या खाली इंटन ची एक बॅच कंपनीत जॉईन झाली त्याच्या वरती सध्या तो यथोच्छा हात धुवून घेत असतो. त्यामुळे एकटाच खाली आलो आणि मामाच्या टपरी वर एक कट आणि गोल्ड फ्लॅक लाईट सांगितली. मामा ची टपरी माझं ऑफिस मधलं चिल करायचे आवडते ठिकाण, दिवसातून तीन-चार वेळेस टपरी वर चहा सिगरेट मारायला येतो मी. डब्बा आणलेला नसतो तेव्हा मामाला मराठवाडी थालिपीठ करायला लावतो मला ते आवडते. थालीपीठ आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा माझं आवडत खाद्य. मामांनी काचेच्या कपात चहा भरला आणि मी ओठात पकडलेली सिगरेट लायटर ने पेटवली आणि पहिला झुरका मारला. उजव्या हाताच्या दोन बोटात सिगरेट नी उरलेल्या तीन बोटात चहा चा ग्लास पकडला आणि हवेत धूर सोडला. चहा चा एक घोट घेत सहज डाव्या हाताने खिशातला मोबाईल काढून व्हाट्स अप चेक केले. तर त्यात  तेच जुने फॉर्वर्डस ऑफिस च्या आणि पर्सनल ग्रुप वरती पडून होते. व्हाट्स अप म्हणजे रिकामटेकड्या लोकांचे घरटे झाले आहे. लोक इतकी रिकामी असतात कि एकाच दिवशी १०-१५ स्टेटस कशी अपडेट करतात कोणाला ठाऊक ! आणि ते पाहतात तरी कोण काय माहित, सिगरेट संपे पर्यंत व्हाट्स अप पाहिले आणि मग उरलेल्या चहा चा एक घोट घेतला, २५ रुपये मामांना गुगल पे केले. लिफ्ट मध्ये चढताना ऑफिस च्या चॅट वरती आज्याचा मेसेज पाहिला,"सी यु ऑल इन कॉन्फरन्स " आणि विचार केला आता कशाला ह्याने बोलावले?, असेल काहीतरी नवीन शहाणपण स्वतःचे ! आसा विचार आला आणि लिफ्ट चे १० नंबर चे बटन दाबले आहे व पुन्हा मोबाईल उघडून बसलो.

एक्सेस कार्ड ने एन्ट्री घेतली तेव्हा राक्या त्याच्या क्यूब मधून उंदरा प्रमाणे डोकं बाहेर कडून माझ्या आगमनाची वाट पाहत होता, मी दिसताच त्याने नाका वरचा चष्मा मागे सारला, मान डोलावत चल अशी खून केली. मी त्याला बघताच भुवया उंचावून "का-काय?" असे डोळ्याने विचारले तेव्हा त्याने ओठ मुडपट डोके वाकडे करत "माहित नाही" असे उत्तर दिले. मी घाई घाईत चघळणारे चिंगम डस्ट बीन मध्ये टाकून माझ्या डेस्क वरची डायरी उचलली तो पर्यंत राक्या माझ्या जवळ आला होता. मी विचारले, "काय झालं, एकदम का कॉल केली मीटिंग !" राक्या बोलला  "भाऊ  मले नाही माहित, पण मुग्याम्बो चा फोन आला नि आज्या पार फिका पडला, त्याच्या केबिन मध्ये जाऊन त्यो मुग्याम्बो शी बोलला आणि लगेच मेसेज आला मीटिंग चा" मी त्याला "हं" म्हटले आणि चालायची खून केली. आम्ही कॉन्फरन्स मध्ये पोहंचलो तेव्हा आज्या त्याच्या लॅपटॉप मध्ये डोके घालून काहीतरी वाचत होता, एक त्याचा चाटू इंटन लॅपटॉप प्रोजेक्टर ला कनेक्ट करत होता तर बाकीची टीम एकमेकां कडे पहात चूप-चाप बसली होती. मी राक्या येताच आज्याने आमच्या कडे पाहिले आणि त्याचा सुतकी चेहरा पुन्हा लॅपटॉप मध्ये घातला. आज्या त्या बाबतीत माहीर होता, मागील दोन वर्षात बॉस नावाचा विषाणू त्याच्या रक्ता-रक्तात भिनला होता. आम्ही दोघे हि जागेवर बसताच, आज्याने त्या इंटन कडे जळका कटाक्ष टाकला तेव्हा त्याने धडपडत प्रोजेक्टर कनेक्ट झाल्याचे सांगितले. सगळी टीम आता आज्या कडे आणि प्रोजेक्टर कडे उत्सुकतेने पाहत होती. आज्या आपल्या सुतकी चेहऱ्याने जागे वरून उठला आणि स्क्रीन समोर येऊन उभा राहिला. राक्या व माझ्या कडे जेव्हा त्याने पाहिले तेव्हा तो त्याच्या हातातल्या पेन्सिल शी खेळात होता. सगळ्या टीम वर त्याने एक जळ जळीत कटाक्ष टाकला व पेन्सिल टेबल वर ठेवत आणि घसा साफ केला त्याने स्क्रीन वरच्या प्रेझेंटेशन ला सुरवात केली. आज्या असा कॅरेक्टर होता कि सगळा फोकस स्वतः कडे राहील याचा तो प्रयत्न करत असे, आज सुद्धा स्वतःचे महत्व वाढावे आणि त्याचे काम दिसावे म्हणून त्याने हि तातडीची मीटिंग बोलावली होती. आम्ही त्याला आता पुरते ओळखले होते. नवीन आलेल्या पोरं करता तो आकर्षणाचा बिंदू होता पण आम्हला चांगलं माहित होत आज्या कसा आहे ते, आज्याने प्रोजेक्ट इन्ट्रो सुरु केला आणि प्रोजेक्ट पेक्षा मॅनॅजमेण्ट ने कसा त्यालाच ह्या प्रोजेक्ट करता निवडला आणि कसा हा प्रोजेक्ट आपल्या करता महत्वाचा आहे याचे पुढील ४५ मिनिटे कौतुक त्याने केले. हा प्रोजेक्ट त्याच्या शिवाय कोणीच करू शकणार नाही असा विश्वास मॅनॅजमेण्ट ला वाटतो हे नवीन पोरांना आज्याने पटवून दिले. नवीन आलेला प्रोजेक्ट किती रेव्हेनु आणणार आहे हे सांगण्या पेक्षा आज्याने नवीन प्रोजेक्ट चा उपयोग ऍनीव्हल रेटिंग मध्ये कसा होईल हेच सांगितले. उरलेल्या -१० मिनिटांत आज्याने सगळा प्रोजेक्ट सांगितलं आणि डेड लाईन सुद्धा ठरवून दिली


मिटिंग
संपल्या वरती मी राक्या उठायला लागलो तेव्हा आज्या ने हाताने खून करता आम्हा दोघांना मला व राक्या बसायला सांगितले, सगळी टीम बाहेर गेल्यावर कॉन्फरन्स च्या चिल्ड AC मुळे गारठलेल्या ब्लॅक कॉफीचा एक सिप आज्याने ओठा आड केला, अगोदरच सुतकी चेहरा आणि त्यात ब्लॅक कॉफीचा कडवट घोट यामुळे आज्या च्या चेहऱ्या वरती आणखीन कडवट पणा दिसत होता. सगळी टीम बाहेर पडलेली पाहून आज्या आमच्या बाजूला सरकला आणि हळू आवाजत बोलला, "मॅनॅजमेन्ट आपल्या परफॉर्मन्स वरती खुश आहे. तुमच्या दोघा कडून मॅनॅजमेण्ट ला खूप अपेक्षा आहेत, मोग्याम्बो मला बोलला !" (हो, आज्या सुद्धा दीक्षित ला मोग्याम्बो म्हणतो, इनफॅक्ट हे नाव त्यानेच दिले आहे) आज्याची दीक्षित समोर फाटते, तो दीक्षित चा फोन आला कि केबिन मध्ये जाऊन बोलतो. त्याचा प्रत्येक शब्दनं शब्द आज्या झेलतो. दीक्षित मुळेच आज्याला प्रमोशन आणि ग्रोथ मिळाली होती. जॉईन झाल्या पासून आज्या बेस्ट परफॉर्मर होता पण त्यापेक्षा आज्या ला त्याचा X-फॅक्टर उपयोगी पडला. दीक्षित कंपनीत वेस्ट झोन चा डायरेक्ट्रर होता त्यामुळे दीक्षित ने सुद्धा आज्याला पुरते ओळखले होत तो त्याच्या ह्या कमजोरीचा फायदा उठवायचा. आज्या सहसा आम्हला एवढा गोड बोलत नाही. त्यात गारठलेली कडवट ब्लॅक कॉफी पिऊन सुद्धा आज्या पोपटा सारखं आज बोलत होता त्या मागचं कारण अजून कळालं नव्हतं, तरी राक्याने डिरिंग करून त्याला विचारलं," अजून काय म्हणाला मोग्याम्बो, इन्क्रिमेंट काही बोलला का ?" हे ऐकताच नाराजीने मी राक्याच्या पायावरती पाय दिला. राक्याला हे अपेक्षित नव्हते. आता अजून आज्या त्याच्यावरती अर्धा तास खाणार अगोदरच भुकेची आय-माय झाली होती आणि राक्याने इन्क्रिमेंट बद्दल आज्याला छेडले, पण राक्याचा प्रश्न आज्याला कॉफी पेक्षा कडवट लागला त्याचा चेहरा आणखीन उतरला, प्रश्न त्याला बोचला होता. त्यामुळे आम्हला निघायच्या सूचना त्याने केल्या. कॉन्फरन्स मधून बाहेर पडल्या पडल्या राक्याला," चुत्या तू कशाला त्याला इनक्रेमेन्ट बद्दल डिवचत होता, तुला भूक नाही का लागली?" मी चिडक्या आवाजात राक्या वरती खेकसलो. लंच ची वेळ टाळून गेली होती. कडाडून भूक लागली होती. मी डेस्क वरती डायरी ठेवली आणि टिफिन उचलला. सकाळी ऑफिस ला निघतांना स्मिता ने टिफिन ची भाजी सांगितली पण आता आवडी निवडीचा प्रश्न नव्हता भुकेचा होता. राक्याला लंच करता हात केला, तो सुद्धा तयार होताच टिफिन घेऊन. दोघे सोबतच कॅन्टीन मध्ये पोहंचलो. टीम मधल्या काही ज्यांची जेवणे चालू होती तर काही जण आशेच कॉफी-चहा च्या नावा खाली रंगळत होते. काही ऑफिस जोडपी सुद्धा त्यात होती, त्यांच्या गप्पा चालू होत्या, जग्गू आमचं कॅन्टीन सांभाळतो त्याची लगबग सुरु होती. टेबल साफ करणे, टेबला वर पाणी देणे, microwave डब्बा गरम करून देणे हि काम जग्गू ची सुरु होती. आम्हला पाहताच कॅन्टीनजीवी आणि ऑफिस जोडपे सावध झाले. त्यातले काही जण लगेच कॅन्टीन मधून निघाले. जग्गू ने आमचा टेबल अगोदरच साफ करून ठेवला होता, आम्हला पहाताच त्याने हसत टेबला वरती पाण्याची बाटली आणून ठेवली. आज्या बॉस झाल्यापासून कॅन्टीन मध्ये जेवत नाही. 


विराज वि देवडीकर 



 

 

 


कथा ९

  बाई म्हणजे माझी आज्जी सुरकुतल्या चेहऱ्याची, टपोऱ्या पाणीदार डोळ्यांची, डोक्यावर पदर घेतलेली, नाकात नथ घेतलेली, कपाळावरती ठसठशीत कुंकवाचा ग...