Sunday, 24 August 2025

कथा ७ (भाग २)

 

पश्चिमे कडील हावे मधील गारवा आता कमी झाला होता, गॅलरी मध्ये लावलेले झुंबर हवे वरती डोलत होते, त्याच्या आवाजाने तिला जाग आली. ती पहाटेची वेळ होती. सूर्य अजून पूर्णपणे उगवला सुद्धा नव्हता. आकाश निळसर काळे होते, पक्षांचा किलबिलाट अजून सुरु व्हायचा होता. बेडरूम मध्ये ती अनिकेतच्या हातावरती झोपली होती. तिला अनिकेतच्या हृदयाचे स्पन्दने पूर्ण जाणवत होते. आता तिला झोप येईल अशी शक्यता नव्हती अनिकेत मात्र शांत निजला होता. किती वेळ त्याच्या हृदयाची धडधड ऐकण्यात निघून गेला तिलाच कळाले नाही. अजून त्याला बिलगत त्याच्या छाती वरील केसांसोबत ती खेळात सकाळ होण्याची वाट पाहत होती. तिच्या डोळ्या समोरून काल रात्रीचे सर्व क्षण डोळ्या समोरून सरकले, अनिकेत चा शांत निजलेला चेहरा पाहून तिला रात्रीचा जंगली अनिकेत आठवत होता. मिलनाची आस असलेली ती अनिकेतला दारात पाहून पूर्ण वितळली होती. संध्याकाळी ७ वाजे पासून ती अनिकेत ची वाट पाहत होती, पण त्याने पुण्यात उतरल्याचा तिला मेसेज केला न फोन, त्यामुळे ती अस्वस्थ झाली,  साधारण ९ वाजता तिची आतुरता शिघेला पोहंचली तेव्हाच दारा वरची बेल वाजली. हा अनिकेतच असेल असे निश्चित वाटून तिने स्वतःला पुन्हा एकदा आरशात पाहिले. खरं तर तिचे स्वतः वरती पहिले प्रेम आहे नंतर अनिकेत चा नंबर. स्वतः करता नटणे-सवरने हे तिचे आवडीचे काम. दार उघडण्यासाठी वळली, हातातला मोबाईल टेबल वर ठेऊन तिने दार उघडले तेव्हा अनिकेत दरवाजात उभा होता. त्याला पाहताच तिच्या डोळ्यात एक चमक उठली आणि तिच्या गाला वरची खळी खुलली. एका हातातली बॅग खाली ठेवत पाठी मागे लपवलेला बुके पुढे केला व दोन्ही हात पसरून तो म्हणाला, "ओह माय लव्ह, कम ऑन" आणि त्याने तिला मिठीत घेतले. पाच मिनिट घट्ट मिठीत धरल्यावर तिला सोडत अनिकेतने तिच्या गालावरती एक किस घेतला. तिने देखील त्याचे किस करत स्वागत केले. बॅग मध्ये घेऊन फ्रेश होण्यासाठी तो बेड रूम मध्ये गेला.

आता पुन्हा एकदा ती एकटीच डायनींग रूम मध्ये होती, चार महिन्या नंतर अनिकेत च्या भेटीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अनिकेत आणि ती मागील सात वर्षा पासून सोबत असले तरी त्यांचा आताचा सगळ्यात मोठा दुरावा होता. कॉलेज मधील अफेयर्स च्या पुढे त्यांचे नाते गेले होते. रात्र रात्र फोन वरती बोलणे किंवा एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी ठेवणे अशा बाल बोध प्रेमी युगल यांच्या पुढे सध्या ते होते. दोघे सुद्धा चांगले कमावते, काही लाखात महिन्याचा पगार असलेले, चांगल्या सुशिक्षित घरून आलेले, दोघांवरती सुद्धा कसल्या ही प्रकारची जवाबदारी नव्हती. दोघांचे ही आई-वडील कसलाही भेदा-भेद मानता त्याचा लग्नाला संमती देणारे होते. तरी सुद्धा दोघांनी अजून लग्नाची किंवा बंधनात अडकण्याची तयारी दाखवली नव्हती. एक दोनदा तिच्या आईने विषय काढला पण तिनेच स्पष्ट नकार दिल्यामुळे पुन्हा त्यांचा लग्नाचा विषय समोर आला नाही. अनिकेतच्या घरचे मात्र त्याच्या लग्ना करता जोरदार प्रयत्न सध्या करत होते. नाही म्हणायला अनिकेतच्या घरच्यांना सुद्धा तिच्या बद्दल माहित होती. मागे सहा महिन्या खाली ते एकत्र मुंबई मध्ये भेटले सुद्धा होते पण मात्र अनिकेत ने स्वतः काही तिच्या सोबत लग्नाचा विषय घरच्यां समोर काढला नाही.

अनिकेत फ्रेश होऊन बाहेर येई पर्यंत तिने चिल्ड रेड वाईन दोन ग्लास मध्ये pour केली, त्याला जरी शिवज रिगल आवडत असली तरी तिच्या करता अनिकेतला रेड वाईन प्यावी लागणार होती. बेड रूम मधून फ्रेश होऊन आल्यावर त्याने तिला जवळ घेतले आणि ओठांची तहान भागवून घेतली. ती देखील त्याच्या त्या कृती ने चेतवली गेली. काही काळ फ्लॅट मध्ये निरव शांतता निर्माण झाली, फक्त त्या दोघांच्या श्वासांचा आवाज आणि ओठांची हालचाल एकवढेच होत होते. दोघांना सुद्धा एकमेकांना सोडावे वाटत नव्हते पण अनिकेत बाजूला झाला, त्याने वाईन चा ग्लास हातात घेतला ग्लास नाकापाशी नेत वाईन श्वासात भरली. तिने देखील तोपर्यंत ग्लास हातात घेतला आणि म्हणाली,"तुझ्या आवडती ऑस्ट्रेलियन yellow tail वाईन आणली आहे", त्यावरती तो गालात हसत तिरक्या नजरेने तिच्या कडे पाहत म्हणाला,"पण तुझ्या ओठां ची रेड वाईन काही और आहे". ती काहीशी लाजली तिने cheers करत वाईनचा पहिला घोट घेतला. त्याने सुद्धा एक सिप घेतला आणि कोच वर अंग मोकळं सोडत निवांत बसला. ती त्याच्या बाजूला उलटी मांडी घालून बसली होती, एका हातात ग्लास दुसरा हात तिने त्याच्या ओल्या कुरळ्या केसातून फिरवला. रेड वाईन चे दोन पेग पोटात गेल्यावर थंडीशी धुंदी दोघांवर चढली. रेड वाईन तशी गोड चा असते त्यामुळे पिताना फारसा त्रास होत नाही सोबत चॉकलेट केक होताच, त्यामुळे वाईन जास्तच बेधुंद करत होती. आता पाऊस पुन्हा सुरु झाला होता. पश्चिमे कडील वारा अजून गार आणि बोचरा झाला होता. अनिकेतने आणलेला डार्क चॉकलेट त्याने तोंडात धरले आणि मानेने जवळ येण्यास खुणावले, त्या सरशी ती हातातला ग्लास टेबलवर ठेवत त्याच्या मांडी वर दोन्ही कडे पाय सोडून बसली त्याचे डोके मागे कोच वर ढकलत त्याच्या तोंडातील डार्क चॉकलेट तिच्या दाताने तोडले खायला सुरवात केली. त्याने सुद्धा त्याचे दोन्ही हात तिच्या कमरे भवती आवळले आणि पुन्हा एकदा तिच्या ओठांवरती आपले ओठ टेकवले. त्यानंतर काही घटिका त्यांच्या प्रणय क्षणाच्या गेल्या, मंद प्रकाश, थंड वारा आणि instrumental song या व्यतरिक्त त्या दोघांच्या श्वासांचा आवाज फक्त फ्लॅट मध्ये होता.

रात्रीचे अनेक बेधुंद क्षण आता पुन्हा तिच्या डोळ्या समोरून जात होती, पहिल्या पावसात नाहून निघालेल्या श्रुष्टि प्रमाणे ती सुद्धा आता ताजीतावणी झाली होती. अनिकेत अजून सुद्धा शांत झोपला होता, कूस बदलत त्याने तिच्या डोक्या खालील हात काढला, तेव्हा तिला पुन्हा एकदा जाग आली होती. आता पूर्ण उजाडले होते. पक्षांचा किलकिलाट सुरु झाला होता. लॉन्ग वीक एन्ड ला सुरवात झाली होती. आज त्या दोघांना कोकणा साठी निघायचे होते. अनेक दिवसा पासून हवा हवासा वाटणारा निवांत सहवास त्यांना एकमेकांचा आता लाभणार होता. ह्या ट्रिप करता तिने अनेक प्लॅन आखले होते. पुढचे तीन दिवस ते एकमेकां सॊबत राहून पुन्हा एकदा एकमेकांना समजणार होते. बेड वरून उठत तिने अंगा वरती वस्त्र चढवले....

No comments:

Post a Comment

कथा ९

  बाई म्हणजे माझी आज्जी सुरकुतल्या चेहऱ्याची, टपोऱ्या पाणीदार डोळ्यांची, डोक्यावर पदर घेतलेली, नाकात नथ घेतलेली, कपाळावरती ठसठशीत कुंकवाचा ग...