Sunday, 13 July 2025

कथा ६

 

पुण्यामधून ताम्हणी घाट मार्गे माणगाव मध्ये उतरलो, कोकणात आल्याची चाहूल त्यावेळेसच लागली होती.  सह्याद्री मधील जंगल या पठारावरती पसरलेले दिसत होते. मागे सह्याद्रीचा खडा पहाड आणि त्याची अंधारात दिसणारी अकराळ विक्राळ आकृती थरकाप उडवत होती. त्यावेळी संध्याकाळचे सहा साडेसहा झाले असतील, अंधार पडायला सुरुवात झाली होती. पक्षी घरट्याकडे वापस येत होते आणि त्यांच्या किलकिलाट झाडावरती सुरू झालेला होता. सह्याद्री आणि जंगल यांचं नातच गूढ आहे, एखाद्या आदि मानवा प्रमाणे सह्याद्री पसरलेला आहे आणि त्याच्या अंगावर विस्तारलेले हे गुढ जंगल आहे. तिन्ही सांजेच्या वेळी आम्ही गाडीने सह्याद्री उतरला होता, वाटेत छोट्या वाड्या- वस्त्या ताम्हणी घाट संपल्या संपल्या सुरू झाल्या होत्या. आम्ही माणगाव मार्गे दिवेआगार रस्त्याने मूळ कोकणात उतरत होतो. आम्हाला ज्या गावी जायचं होतं ते गाव अजून खुप दूर होते आणि त्यात कोकणातले हे वळणावळणाचे रस्ते त्यामुळे काही अंतर कापायला तास दीड तासाचा वेळ लागणार होता याचे आम्हाला जाणीव होते. आता ताम्हणी घाट मागे पडून बराच वेळ झाला होता आणि आम्ही अजून त्या गावी पोहोचलो नव्हतो. आता रात्रीचे दहा-साडेदहा झाले होते पोटात कावळे ओरडायला लागले होते. सगळ्यांना प्रचंड भूक लागली होती पण याआड मार्गी रस्त्यावरती जेवणा करता तर सोडाच, पण साधे चहा पाण्याचे सुद्धा छोटा हॉटेल किंवा टपरी नव्हती, गोल गोल फिरणारा रस्ता, काळाकुट्ट अंधार आणि प्रचंड मोठा जंगल एवढेच काय ते आमच्या सोबत चालत होते.

एकत्र आम्ही पाच जणांनी ही कोकणची ट्रिप प्लॅन केली होती. खूप दिवसापासून एकत्रित फिरायला जायचं ठरवत होतो पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ते रद्द होत होते. यावेळी मात्र मुहूर्त साधला सर्वजण या ट्रीपला निघालो. पुण्यातून निघताना आम्ही या चार दिवसाच्या ट्रीपचे प्रचंड मोठे नियोजन केले होते म्हणजे प्रत्येक दिवशी काय करायचे याची सविस्तर आणि मोठी अशी यादीत आमच्याकडे होती पण हा अनुभव पाहता त्यातील पहिलेच नियोजन आता फसताना आम्हाला जाणवत होते. भूक आणि हा गोल गोल वळणाचा प्रवास आता कंटाळवाणा बनत होता. रात्रीच्या अकरा वाजले तरी खायला काही मिळत नव्हते म्हणून चिडचिड होत होती. अंधार असल्यामुळे किती अंतर कापले याचा सुद्धा अंदाज येत नव्हता. पाय मोकळे करावे म्हणून सिगरेट चे एक दोन  झुरके मारावे असा विचार आल्यामुळे आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला लावली खाली उतरलो. रस्त्याहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना आमची गाडी दिसावी म्हणून पार्किंग लाईट लावले होते. यावेळी त्या रस्त्यावरती आमच्या शिवाय इतर कोणीच नव्हते, डोळ्यासमोर काळाकुट्ट अंधार होता,  मात्र पार्किंग लाईटच्या तांबड्या चालू बंद प्रकाशात आम्ही एकमेकांना चाचपडत होतो

मागील काही तासापासून गाडीतील एसीमध्ये बसल्यामुळे बाहेरच्या हवेचा आम्हाला स्पर्श नव्हता पण गाडी बाहेर उतरतात आम्हाला एक अनाहूत अशा थंडाव्याचा स्पर्श बाहेरच्या हवेमध्ये जाणून गेला. दूरपर्यंत मनुष्यवस्तीचा कसलाच नामोनिशान नव्हता ते  दिसणार तरी कसा कारण आम्ही गर्द जंगलामध्ये होतोत. आमच्यापैकी एकाने आणलेल्या सिगरेटच्या पाकिटामधून एक सिगरेट काढून ओठांमध्ये धरत लायटरने पेटवली. एक मोठा झुरका ओढला, तेव्हा जळालेल्या तंबाखूच्या वासाने आमच्या डोक्याला झणझण्या आल्या थोडासा तणाव मुक्त झाल्यासारखे वाटायला लागले. अजून एक दोघांनी सिगरेट पेटवल्या, मनसोक्त झुरके मारून झाल्यावर आम्ही पुढील प्रवासा साठी गाडी मध्ये बसण्याकरता वळालो तेव्हा कोणीतरी आमचा कानोसा घेत असल्यासारखे जाणवले, सिगरेट च्या झुरक्याने थोडे ताजेपण आमच्यात आले होते, भूक सुद्धा थोडी कमी झाली होती. हवेत अजून सुद्धा तसाच गारवा होता. निरव शांतता आणि गडद अंधार डोळ्यासमोर होता. आम्ही सर्व पुन्हा एकदा गाडीत बसलो आणि गाडी सुरु करण्यासाठी म्हणून पार्किंग लाईट बंद केल्या, आता सर्वत्र अंधार होता, गाडीत आणि गाडीच्या बाहेर दोन्ही ठिकाणी फक्त काळोखाचे साम्राज्य होते. सर्व गाडीत बसल्याची खात्री केली आणि गाडी सुरु करून हेडलाईट लावली व पाहतो ते  समोर काय !

 क्रमशः

कथा ९

  बाई म्हणजे माझी आज्जी सुरकुतल्या चेहऱ्याची, टपोऱ्या पाणीदार डोळ्यांची, डोक्यावर पदर घेतलेली, नाकात नथ घेतलेली, कपाळावरती ठसठशीत कुंकवाचा ग...