Sunday, 24 August 2025

कथा ७ (भाग २)

 

पश्चिमे कडील हावे मधील गारवा आता कमी झाला होता, गॅलरी मध्ये लावलेले झुंबर हवे वरती डोलत होते, त्याच्या आवाजाने तिला जाग आली. ती पहाटेची वेळ होती. सूर्य अजून पूर्णपणे उगवला सुद्धा नव्हता. आकाश निळसर काळे होते, पक्षांचा किलबिलाट अजून सुरु व्हायचा होता. बेडरूम मध्ये ती अनिकेतच्या हातावरती झोपली होती. तिला अनिकेतच्या हृदयाचे स्पन्दने पूर्ण जाणवत होते. आता तिला झोप येईल अशी शक्यता नव्हती अनिकेत मात्र शांत निजला होता. किती वेळ त्याच्या हृदयाची धडधड ऐकण्यात निघून गेला तिलाच कळाले नाही. अजून त्याला बिलगत त्याच्या छाती वरील केसांसोबत ती खेळात सकाळ होण्याची वाट पाहत होती. तिच्या डोळ्या समोरून काल रात्रीचे सर्व क्षण डोळ्या समोरून सरकले, अनिकेत चा शांत निजलेला चेहरा पाहून तिला रात्रीचा जंगली अनिकेत आठवत होता. मिलनाची आस असलेली ती अनिकेतला दारात पाहून पूर्ण वितळली होती. संध्याकाळी ७ वाजे पासून ती अनिकेत ची वाट पाहत होती, पण त्याने पुण्यात उतरल्याचा तिला मेसेज केला न फोन, त्यामुळे ती अस्वस्थ झाली,  साधारण ९ वाजता तिची आतुरता शिघेला पोहंचली तेव्हाच दारा वरची बेल वाजली. हा अनिकेतच असेल असे निश्चित वाटून तिने स्वतःला पुन्हा एकदा आरशात पाहिले. खरं तर तिचे स्वतः वरती पहिले प्रेम आहे नंतर अनिकेत चा नंबर. स्वतः करता नटणे-सवरने हे तिचे आवडीचे काम. दार उघडण्यासाठी वळली, हातातला मोबाईल टेबल वर ठेऊन तिने दार उघडले तेव्हा अनिकेत दरवाजात उभा होता. त्याला पाहताच तिच्या डोळ्यात एक चमक उठली आणि तिच्या गाला वरची खळी खुलली. एका हातातली बॅग खाली ठेवत पाठी मागे लपवलेला बुके पुढे केला व दोन्ही हात पसरून तो म्हणाला, "ओह माय लव्ह, कम ऑन" आणि त्याने तिला मिठीत घेतले. पाच मिनिट घट्ट मिठीत धरल्यावर तिला सोडत अनिकेतने तिच्या गालावरती एक किस घेतला. तिने देखील त्याचे किस करत स्वागत केले. बॅग मध्ये घेऊन फ्रेश होण्यासाठी तो बेड रूम मध्ये गेला.

आता पुन्हा एकदा ती एकटीच डायनींग रूम मध्ये होती, चार महिन्या नंतर अनिकेत च्या भेटीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अनिकेत आणि ती मागील सात वर्षा पासून सोबत असले तरी त्यांचा आताचा सगळ्यात मोठा दुरावा होता. कॉलेज मधील अफेयर्स च्या पुढे त्यांचे नाते गेले होते. रात्र रात्र फोन वरती बोलणे किंवा एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी ठेवणे अशा बाल बोध प्रेमी युगल यांच्या पुढे सध्या ते होते. दोघे सुद्धा चांगले कमावते, काही लाखात महिन्याचा पगार असलेले, चांगल्या सुशिक्षित घरून आलेले, दोघांवरती सुद्धा कसल्या ही प्रकारची जवाबदारी नव्हती. दोघांचे ही आई-वडील कसलाही भेदा-भेद मानता त्याचा लग्नाला संमती देणारे होते. तरी सुद्धा दोघांनी अजून लग्नाची किंवा बंधनात अडकण्याची तयारी दाखवली नव्हती. एक दोनदा तिच्या आईने विषय काढला पण तिनेच स्पष्ट नकार दिल्यामुळे पुन्हा त्यांचा लग्नाचा विषय समोर आला नाही. अनिकेतच्या घरचे मात्र त्याच्या लग्ना करता जोरदार प्रयत्न सध्या करत होते. नाही म्हणायला अनिकेतच्या घरच्यांना सुद्धा तिच्या बद्दल माहित होती. मागे सहा महिन्या खाली ते एकत्र मुंबई मध्ये भेटले सुद्धा होते पण मात्र अनिकेत ने स्वतः काही तिच्या सोबत लग्नाचा विषय घरच्यां समोर काढला नाही.

अनिकेत फ्रेश होऊन बाहेर येई पर्यंत तिने चिल्ड रेड वाईन दोन ग्लास मध्ये pour केली, त्याला जरी शिवज रिगल आवडत असली तरी तिच्या करता अनिकेतला रेड वाईन प्यावी लागणार होती. बेड रूम मधून फ्रेश होऊन आल्यावर त्याने तिला जवळ घेतले आणि ओठांची तहान भागवून घेतली. ती देखील त्याच्या त्या कृती ने चेतवली गेली. काही काळ फ्लॅट मध्ये निरव शांतता निर्माण झाली, फक्त त्या दोघांच्या श्वासांचा आवाज आणि ओठांची हालचाल एकवढेच होत होते. दोघांना सुद्धा एकमेकांना सोडावे वाटत नव्हते पण अनिकेत बाजूला झाला, त्याने वाईन चा ग्लास हातात घेतला ग्लास नाकापाशी नेत वाईन श्वासात भरली. तिने देखील तोपर्यंत ग्लास हातात घेतला आणि म्हणाली,"तुझ्या आवडती ऑस्ट्रेलियन yellow tail वाईन आणली आहे", त्यावरती तो गालात हसत तिरक्या नजरेने तिच्या कडे पाहत म्हणाला,"पण तुझ्या ओठां ची रेड वाईन काही और आहे". ती काहीशी लाजली तिने cheers करत वाईनचा पहिला घोट घेतला. त्याने सुद्धा एक सिप घेतला आणि कोच वर अंग मोकळं सोडत निवांत बसला. ती त्याच्या बाजूला उलटी मांडी घालून बसली होती, एका हातात ग्लास दुसरा हात तिने त्याच्या ओल्या कुरळ्या केसातून फिरवला. रेड वाईन चे दोन पेग पोटात गेल्यावर थंडीशी धुंदी दोघांवर चढली. रेड वाईन तशी गोड चा असते त्यामुळे पिताना फारसा त्रास होत नाही सोबत चॉकलेट केक होताच, त्यामुळे वाईन जास्तच बेधुंद करत होती. आता पाऊस पुन्हा सुरु झाला होता. पश्चिमे कडील वारा अजून गार आणि बोचरा झाला होता. अनिकेतने आणलेला डार्क चॉकलेट त्याने तोंडात धरले आणि मानेने जवळ येण्यास खुणावले, त्या सरशी ती हातातला ग्लास टेबलवर ठेवत त्याच्या मांडी वर दोन्ही कडे पाय सोडून बसली त्याचे डोके मागे कोच वर ढकलत त्याच्या तोंडातील डार्क चॉकलेट तिच्या दाताने तोडले खायला सुरवात केली. त्याने सुद्धा त्याचे दोन्ही हात तिच्या कमरे भवती आवळले आणि पुन्हा एकदा तिच्या ओठांवरती आपले ओठ टेकवले. त्यानंतर काही घटिका त्यांच्या प्रणय क्षणाच्या गेल्या, मंद प्रकाश, थंड वारा आणि instrumental song या व्यतरिक्त त्या दोघांच्या श्वासांचा आवाज फक्त फ्लॅट मध्ये होता.

रात्रीचे अनेक बेधुंद क्षण आता पुन्हा तिच्या डोळ्या समोरून जात होती, पहिल्या पावसात नाहून निघालेल्या श्रुष्टि प्रमाणे ती सुद्धा आता ताजीतावणी झाली होती. अनिकेत अजून सुद्धा शांत झोपला होता, कूस बदलत त्याने तिच्या डोक्या खालील हात काढला, तेव्हा तिला पुन्हा एकदा जाग आली होती. आता पूर्ण उजाडले होते. पक्षांचा किलकिलाट सुरु झाला होता. लॉन्ग वीक एन्ड ला सुरवात झाली होती. आज त्या दोघांना कोकणा साठी निघायचे होते. अनेक दिवसा पासून हवा हवासा वाटणारा निवांत सहवास त्यांना एकमेकांचा आता लाभणार होता. ह्या ट्रिप करता तिने अनेक प्लॅन आखले होते. पुढचे तीन दिवस ते एकमेकां सॊबत राहून पुन्हा एकदा एकमेकांना समजणार होते. बेड वरून उठत तिने अंगा वरती वस्त्र चढवले....

Friday, 22 August 2025

कथा ७

 पुण्याच्या विमानतळावर विमान उतरायला ६.३० वाजले. विमान अर्धा तास उशिराने पोहंचले होते. साधारण पणे ४०-४५ मिनिटे अजून त्याला लागणार, विमानतळाच्या बाहेर यायला. चार महिन्यांनी तो रेश्माला भेटणार होते. लॉन्ग डिस्टंट रिलेशन मागचे दीड वर्ष ते दोघे अनुभवत होते. तो दीड वर्षा खाली बेंगलुरू च्या IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जॉईन झाला. मोठी कंपनी, चांगला जॉब आणि वाढून मिळालेली सॅलरी या मुळे त्याने हा बेंगलुरू चा जॉब स्वीकारला होता. साऊथ बेंगळुरू मध्ये कंपनीने दिलेल्या एका मोठ्या फ्लॅट सध्या तो एकटाच राहत असे.  लग्नाचे वय झालेले असून सुद्धा फक्त रेश्मा साठी तो थांबला, पण दोघांनी अजून लग्न केलेले नव्हते. मागील सात वर्षा पासून रेश्मा व तो रिलेशन मध्ये होते. पोस्ट ग्रॅज्युवेशन च्या शेवटच्या वर्षाला असताना त्याने रेश्माला प्रपोज केले, सुरवातीला तिचा विश्वास च बसेना, ती म्हणाली "तीन वर्ष सोबत आहोत, आणि आत कॉलेज संपताना कशाला मला गुंतून ठेवतो आहेस" , त्यावर तो हसून "ही फक्त सुरवात आहे " एवढेच म्हणाला. रेश्माने पुढे दोन महिने घेतले त्याला हो म्हणायला.

खरं तर रेश्मा व तो PG च्या पहिल्या वर्षा पासून सोबत नव्हते, तो रेश्माचा सिनियर कॉलेज संपल्यावर सुद्धा एक वर्ष हा रेश्मा साठी मुंबईतच थांबला वाट पाहत. Paid internship च्या नावा खाली हा रेश्मा साठी मुंबईत थांबलेला होता. तिचे कॉलजे संपत आले तेव्हा शेवटी त्याने तिला प्रपोज केले. रेश्मा मूळची नागपूरची आणि तो मुंबई चा, दोघांची भेट मुंबईत झाली असली तरी त्यांचे प्रेम पुण्यात बहरात आले. त्याच स्पेशलाजेशन IT होते तर तिचे मार्केटिंग पण पहिला जॉब दोघाना पुण्याचा मिळाला. तो हिंजवडी मधील IT कंपनीत जॉब करायला लागला तेव्हा तिने एका मार्कटिंग कंन्सल्टंसी मध्ये जॉईन झाली होती. तो हिंजवडी मध्ये मित्रां सोबत राहायला लागला तर ती कोथरूड मध्ये पेइंग गेस्ट मध्ये राहत होती. एक-दीड वर्ष वेगळं राहिल्या नंतर त्यांनी बाणेर ला एकत्रित फ्लॅट रेंट वर घेतला. लिव्ह इन रिलेशन शिप मध्ये राहायचे ठरवले. लग्न अगोदर असे एकत्र राहणे थोडे वेगळे वाटते पण तो पर्यंत त्या दोघांनी लग्नाचा विचार सुद्धा केला नव्हता, आता तरी कुठे केला आहे. लग्न त्यांच्या दृष्टीने सध्यातरी लांब होते. चार महिन्याखाली रेश्मा बेंगळुरू ला गेली होती तेव्हा त्यांची शेवटची भेट झाली. तेव्हा पासून आज पर्यंत ते भेटले नव्हते त्यामुळे त्याला रेश्माच्या भेटीची प्रचंड ओढ लागली होती. विमानातून उतरून चेक आऊट पूर्ण होई पर्यंत ३०-४० मिनिटे गेली, बाहेर आला तेव्हा पावसाला सुरवात झाली होती. कॅब करून त्याने बाणेर ला जायचे ठरवले. पुण्याच्या ट्राफिक मधून रास्ता काढून बाणेर पर्यंत पोहचायला त्याला ९.००-९.३० होणार होते. त्यामुळे कॅब येण्यापूर्वी त्याने विमानतळ बाहेर येऊन सिगारेट पेटवली आणि कॅब ची वाट पाहत सिगरेट चे झुरके मारत उभा राहिला. रेश्माला त्याच्या येण्याची माहिती होती पण पुण्यात उतरल्याचा फोन त्याने रेशीमला केला नव्हता.

इकडे बाणेर च्या सिल्व्हर कर्स्ट सोसायटीच्या १० फ्लोअर वर रेश्मा तिच्या २ BHK फ्लॅट मध्ये त्याला भेटायची तयारी करता होती. दुपारी ऑफिस मधून आज ती लवकर आली. आज रात्री त्याच्या सोबत डिनर प्लॅन तिने केला होता. उद्या पासून सुरु होणाऱ्या लॉन्ग वीक एन्ड साठी त्या दोघांनी कोकणात फिरायला जायचे ठरवलेले होते, त्या प्रमाणे सर्व बुकिंग त्याने अगोदरच केली होती. रेश्माच्या कार ने सकाळी लवकर ताम्हणी घाट मार्गे ते दोघे कोकणात फिरायला जाणार होते, मागच्या चार महिन्यापासून त्यांना जो एकांत मिळाला नव्हता तो या तीन दिवसाच्या सुट्ट्या मध्ये मिळवण्याचा त्यांचा विचार होता. रेश्माने तिला आवडेल असा वने पीस घातला होता. तिला ही डेट काहीतरी स्पेशल करायची होती. म्हणून तिने आजच्या संध्याकाळ चे वेगळे नियोजन केले होते. दुपारी ऑफिस वरून येताना तिने चॉकलेट केक, सोबत रेड वाईन आणि त्याच्या साठी शिवाज रिगल घेतली होती. फ्लॅट मध्येच रोमँटिक डेट आणि डीनर असे ठरवले, पण अजून त्याचा पुण्यात उतरल्याचे फोन आला नव्हता. साडे तीन -चार वाजता विमानात बसण्या पूर्वी त्याने रेश्माला फोन केला होता. साडे सहा वाजले तरी त्याचा फोन आला नव्हता म्हणून ती विचार करता होती. तिचा फ्लॅट १० फ्लोअर वर असल्यामुळे पश्चिम बाजू कडून येणारी थंड हवा वाहत होती. पावसाची सुरवात होताना तिने पाहिले व व्हाट्स अप वरचा त्याचा लास्ट सीन चेक केला. तो ०४.०० वाजता चा दिसत होता, म्हणजे त्याने अजून फोन सुरु केला नव्हता अशी तिची खात्री झाली व ती घरातले काम संपवून फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेली.

विमानात फ्लाईट मोडवर टाकलेला मोबाईल त्याने सुरु केला, तेव्हा त्याला लक्षात आले, रेश्माला अजून त्याने पुण्यात उतरल्याचे कळवले नव्हते. काही विचार करून त्याने टाईप केलेला मेसेज डिलीट केला आणि  सिगरेट चा  शेवटचा झुरका मारून त्याने ती पायात टाकून विझवली. माऊथ फ्रेशनर तोंडात टाकले आणि तो गाडीत बसला. गाडी आता संचयती चा ब्रिज ओलांडून गणेश खिंड रस्त्याला लागली. ऍग्रीकल्चर कॉलेज च्या समोरील पेट्रोल पंपा वर त्याने गाडी थांबवून एक छानसं बुके घेतला. ताज्या टव टवित फुलांचा गुच्छ त्याने रेश्मा साठी बांधून घेतला, खरं तर त्याला बुके वगैरे हे खूप नाटकी वाटत, त्याला मोगऱ्याचा गजरा आणि त्याचा वास आवडतो पण रेश्माचा स्वभाव त्याला माहित होता तिला या पारंपरिक गोष्टी पेक्षा वेस्टर्न कल्चर आवडते, तिच्या समाधाना साठी त्याने एक लाल गुलाबांचा बुके घेतला. मघाशी एअरपोर्ट वर त्याने डार्क चॉकलेट तिच्या साठी खरेदी केले होते. परफ़ेकत डेट ची त्याची तयारी त्याने पूर्ण केली. आता गाडी युनिव्हर्सिटी सर्कल ओलांडून बाणेर रस्त्याला लागली. रेश्माने त्याला काल व्हाट्स अप केलेले फोटोत तिचे सौंदर्य तो निहाळत होता. तिच्या सौंदर्याची भुरळ त्याच्या वर प्रचंड होती, कॉलेज मध्ये असताना तो रेश्माच्या सौंदर्य वर फिदा असायचा. आता सुद्धा ती तेवढीच मादक होती. पुरुषाला स्त्रीचे मादक सौंदर्य आवडत असते, पुरुषांना स्त्रीचे सौंदर्य तिच्या डोळ्यात दिसते. ते डोळेच असतात स्त्रीचे जे पुरुषांना संमोहित करता आणि पुरुष तिच्या कडे खेचला जातो. सिल्वर कर्स्ट च्या पार्किंग मध्ये कॅब थांबली आणि तो उतरला, अजून सुद्धा पश्चिमे कडील थंड वारा वाहत होता, पावसाची रिम झिम थांबली होती. १००४ नंबरच्या फ्लॅट मध्ये रेश्मा तेव्हा तयार होऊन त्याची वाट पाहत होती. रात्रीचे ९ वाजत होते, फ्लॅट मध्ये लावलेल्या मंद पण प्रफुल्लीत करणाऱ्या प्रकाशा मुळे प्रसन्न वातावरण निर्मण होत होते. रेश्मा कोच वरती बसून मॅक्झिन चाळत होती. होम थेटर वर instrumental songs सुरु होते. बर्फाने भरलेल्या आईस बकेट मध्ये ठेवलेली रेड वाईनची बाटली खोचली होती. सोबत एक वाईन आणि व्हिस्की चा ग्लास ठेवला होता. फ्लॅट मधील रोमँटिक वातावरणा मुळे रेश्माच्या सौंदर्यात अजूनच भर पडत होती. प्रणया करता आतुर असलेली रेश्मा त्याच्या वाटे कडे डोळे लावून बसली होती. तेवढ्यात दारावरील बेल वाजली आणि रेश्मा ला त्याच्या येण्याची चाहूल लागली, रेश्माने पुन्हा एकदा स्वतःला आरशात निहाळले, ड्रेस आणि केस नीट केले आणि परफ्युम चा फवार त्यावर मारला, माने खाली तिने परफ्युम लावले आणि ओठावर लिपस्टिक चा एक हात फिरवला. ती ड्रॉइंग रूम कडे जाऊन दरवाजा उघडायला वळली. तो दरवाजाच्या बाहेर तिच्या साठी ताटकळत उभा होता. त्याला रेश्माची सवय माहित होती. दरवाजा उघडण्याच्या प्रतीक्षेत तो तिची वाट पाहत होता.

क्रमशः

  

कथा ९

  बाई म्हणजे माझी आज्जी सुरकुतल्या चेहऱ्याची, टपोऱ्या पाणीदार डोळ्यांची, डोक्यावर पदर घेतलेली, नाकात नथ घेतलेली, कपाळावरती ठसठशीत कुंकवाचा ग...