चहा-सुटा मारायला आता खाली उतरलो, सकाळी ९ वाजता लॉग इन केल्या पासून एका मागून एक कॉल line-up होते, त्यामुळे पाणी प्यायला काय किंवा
खाजवायला सुद्धा वेळ मिळाला नाही. लंच ला अजून तास दीड तास होता. तेव्हा म्हटलं चहा सिगरेट तरी मारू म्हणून राक्याला पिंग केले. राक्या म्हणजे आमचा राकेश मूळचा विदर्भातला माझ्या सोबत प्रोजेक्ट मॅनेजर आहे. त्याला पिंग केलं तर पठ्या कुठल्या तरी चिनी क्लायंट समोर डोकं आपटत बसला होता. डोळ्यावरचा चष्मा नाकावरती घसरलेला पण पसरलेल्या नाका मुळे अडलेला, विदर्भाचे ऊन चेहऱ्यावरती झळाळलेले, राक्या तसा शांत पण आज या चीन्या ने त्याचा घाम
काढला. राक्या च्या काना वरचे केस त्या चीन्या ने उभे केले होते. ह्याला चिनी येत नाही आणि त्याला इंग्लिश कळत नाही. आणि मग आहेत दोघे ही गुगल करत बोलणारे. त्या चीनी ची आई-माई काढत राक्याने 'तुझं तू जाऊन ये बे', असं मला सुनावले. बॉस च्या केबिन कडे पाहिलं तेव्हा आज्या कोणत्या तरी इंटन वर चढत होता, कारण काय माहित नाही मी माहिती सुद्धा घेतली नाही. त्याच हे आज काल नेहमीचे झाला आहे. तर आज्या म्हणजे आमचा अजय आमचा बॉस, मी राक्या आणि आज्या आम्ही सोबतच ह्या कंपनीत executive म्हणून लागलो होतोत पण कर्तृत्वान अजय मध्ये कर्तृत्वा सोबत एक सुप्त गुण होता आणि त्या गुणा मुळे तो आज आमचा बॉस बनला होता. आज्या तसा आमचा मित्र पण कंपनी प्रिमायसिस मध्ये तो आमचा बॉस असतो. त्याला तरी चहा सुटा करता विचारावे म्हटले तर तो त्याच्या आवडत्या कामत व्यस्त होता. दोन महिन्या खाली ६ इंटन ची एक बॅच कंपनीत जॉईन झाली त्याच्या वरती सध्या तो यथोच्छा हात धुवून घेत असतो. त्यामुळे एकटाच खाली आलो आणि मामाच्या टपरी वर एक कट आणि गोल्ड फ्लॅक लाईट सांगितली. मामा ची टपरी माझं ऑफिस मधलं चिल करायचे आवडते ठिकाण, दिवसातून तीन-चार वेळेस टपरी वर चहा सिगरेट मारायला येतो मी. डब्बा आणलेला नसतो तेव्हा मामाला मराठवाडी थालिपीठ करायला लावतो मला ते आवडते. थालीपीठ आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा माझं आवडत खाद्य. मामांनी काचेच्या कपात चहा भरला आणि मी ओठात पकडलेली सिगरेट लायटर ने पेटवली आणि पहिला झुरका मारला. उजव्या हाताच्या दोन बोटात सिगरेट नी उरलेल्या तीन बोटात चहा चा ग्लास पकडला आणि हवेत धूर सोडला. चहा चा एक घोट घेत सहज डाव्या हाताने खिशातला मोबाईल काढून व्हाट्स अप चेक केले. तर त्यात तेच जुने फॉर्वर्डस ऑफिस च्या आणि पर्सनल ग्रुप वरती पडून होते. व्हाट्स अप म्हणजे रिकामटेकड्या लोकांचे घरटे झाले आहे. लोक इतकी रिकामी असतात कि एकाच दिवशी १०-१५ स्टेटस कशी अपडेट करतात कोणाला ठाऊक ! आणि ते पाहतात तरी कोण काय माहित, सिगरेट संपे पर्यंत व्हाट्स अप पाहिले आणि मग उरलेल्या चहा चा एक घोट घेतला, २५ रुपये मामांना गुगल पे केले. लिफ्ट मध्ये चढताना ऑफिस च्या चॅट वरती आज्याचा मेसेज पाहिला,"सी यु ऑल इन कॉन्फरन्स " आणि विचार केला आता कशाला ह्याने बोलावले?, असेल काहीतरी नवीन शहाणपण स्वतःचे ! आसा विचार आला आणि लिफ्ट चे १० नंबर चे बटन दाबले आहे व पुन्हा मोबाईल उघडून बसलो.
मिटिंग संपल्या वरती मी व राक्या उठायला लागलो तेव्हा आज्या ने हाताने खून
करता आम्हा दोघांना मला व राक्या बसायला सांगितले, सगळी टीम बाहेर गेल्यावर कॉन्फरन्स
च्या चिल्ड AC मुळे गारठलेल्या ब्लॅक कॉफीचा एक सिप आज्याने ओठा आड केला, अगोदरच सुतकी
चेहरा आणि त्यात ब्लॅक कॉफीचा कडवट घोट यामुळे आज्या च्या चेहऱ्या वरती आणखीन कडवट
पणा दिसत होता. सगळी टीम बाहेर पडलेली पाहून आज्या आमच्या बाजूला सरकला आणि हळू आवाजत
बोलला, "मॅनॅजमेन्ट आपल्या परफॉर्मन्स वरती खुश आहे. तुमच्या दोघा कडून मॅनॅजमेण्ट
ला खूप अपेक्षा आहेत, मोग्याम्बो मला बोलला !" (हो, आज्या सुद्धा दीक्षित ला मोग्याम्बो
म्हणतो, इनफॅक्ट हे नाव त्यानेच दिले आहे) आज्याची दीक्षित समोर फाटते, तो दीक्षित
चा फोन आला कि केबिन मध्ये जाऊन बोलतो. त्याचा प्रत्येक शब्दनं शब्द आज्या झेलतो. दीक्षित
मुळेच आज्याला प्रमोशन आणि ग्रोथ मिळाली होती. जॉईन झाल्या पासून आज्या बेस्ट परफॉर्मर
होता पण त्यापेक्षा आज्या ला त्याचा X-फॅक्टर उपयोगी पडला. दीक्षित कंपनीत वेस्ट झोन
चा डायरेक्ट्रर होता त्यामुळे दीक्षित ने सुद्धा आज्याला पुरते ओळखले होत तो त्याच्या
ह्या कमजोरीचा फायदा उठवायचा. आज्या सहसा आम्हला एवढा गोड बोलत नाही. त्यात गारठलेली कडवट ब्लॅक कॉफी पिऊन सुद्धा आज्या पोपटा सारखं आज बोलत होता त्या मागचं कारण अजून कळालं नव्हतं, तरी राक्याने डिरिंग करून त्याला विचारलं," अजून काय म्हणाला मोग्याम्बो, इन्क्रिमेंट च काही बोलला का ?" हे ऐकताच नाराजीने मी राक्याच्या पायावरती पाय दिला. राक्याला हे अपेक्षित नव्हते. आता अजून आज्या त्याच्यावरती अर्धा तास खाणार अगोदरच भुकेची आय-माय झाली होती आणि राक्याने इन्क्रिमेंट बद्दल आज्याला छेडले, पण राक्याचा प्रश्न आज्याला कॉफी पेक्षा कडवट लागला त्याचा चेहरा आणखीन च उतरला, प्रश्न त्याला बोचला होता. त्यामुळे आम्हला निघायच्या सूचना त्याने केल्या. कॉन्फरन्स मधून बाहेर पडल्या पडल्या राक्याला," चुत्या तू कशाला त्याला इनक्रेमेन्ट बद्दल डिवचत होता, तुला भूक नाही का लागली?" मी चिडक्या आवाजात राक्या वरती खेकसलो. लंच ची वेळ टाळून गेली होती. कडाडून भूक लागली होती. मी डेस्क वरती डायरी ठेवली आणि टिफिन उचलला. सकाळी ऑफिस ला निघतांना स्मिता ने टिफिन ची भाजी सांगितली पण आता आवडी निवडीचा प्रश्न नव्हता भुकेचा होता. राक्याला लंच करता हात केला, तो सुद्धा तयार होताच टिफिन घेऊन. दोघे सोबतच कॅन्टीन मध्ये पोहंचलो. टीम मधल्या काही ज्यांची जेवणे चालू होती तर काही जण आशेच कॉफी-चहा च्या नावा खाली रंगळत होते. काही ऑफिस जोडपी सुद्धा त्यात होती, त्यांच्या गप्पा चालू होत्या, जग्गू आमचं कॅन्टीन सांभाळतो त्याची लगबग सुरु होती. टेबल साफ करणे, टेबला वर पाणी देणे, microwave
डब्बा गरम करून देणे हि काम जग्गू ची सुरु होती. आम्हला पाहताच कॅन्टीनजीवी आणि ऑफिस जोडपे सावध झाले. त्यातले काही जण लगेच कॅन्टीन मधून निघाले. जग्गू ने आमचा टेबल अगोदरच साफ करून ठेवला होता, आम्हला पहाताच त्याने हसत टेबला वरती पाण्याची बाटली आणून ठेवली. आज्या बॉस झाल्यापासून कॅन्टीन मध्ये जेवत नाही.
विराज वि देवडीकर
